शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे एकत्र आले तर सोलापूर आणि माढा यांची समीकरणे बदलणार ?| ncp sharad pawar ajit pawar

ncp sharad pawar ajit pawar:

सन 2003 राज्यामध्ये एकाच जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले होते. सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री तर सोलापूरच्या विजयसिंह मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्री पद मिळालं होतं. महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यामधले मुख्यमंत्री अनेक उपमुख्यमंत्री पद असलेलं सत्तेचे केंद्रीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं कदाचित सत्ता इतक्या मोठ्या प्रमाणात एका जिल्ह्यात गेल्याच ही पहिलीच वेळ असावी. आता हे आत्ताच सांगायची गरज काय तर हेच माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री आज एकत्र आले कुठे? तर अकलूज जवळच्या शिवरत्न बंगल्यावरती. जो बंगला 1999, 2019 आणि 2024 च्या पक्ष प्रवेशाच्या निर्णयासाठी गाजतोय. 2

2009 मध्ये शरद पवार जेव्हा माळ्यातून लोकसभेला उभे होते तेव्हा हे तिन्ही नेते अकलूज मध्ये प्रचारासाठी व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी हे तिन्ही नेते एकत्र आले आहेत. जेव्हा राज्याच्या राज्यकारणात मोठे नेते एकत्र येतात तेव्हा जुनी समीकरणे निश्चितपणे बदलतात आता सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवारांच्या एकत्रित येण्याने माढा आणि सोलापूरची समीकरणे नेमकी कशी बदलू शकतात, या दोघांना एकत्रित आणल्यामुळे शरद पवार नक्की कोणत्या बेरजेचे राजकारण करू पाहतायत, जाणून घेऊया पुढील माहितीमध्ये.

तीन नेत्यांच्या एकत्रित येण्याने सोलापूर लोकसभेचे समीकरण कशा पद्धतीने बदलू शकते?

सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात या तीन नेत्यांच्या एकत्रित येण्याने सोलापूर लोकसभेचे समीकरण कशा पद्धतीने बदलू शकते? सोलापूर मध्ये तीन वेळा खासदार राहिलेले आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद अनुभवलेले सुशीलकुमार शिंदे यांना 2014 आणि 2019 मध्ये सलग दोनदा पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014 ला सोलापूर मधून सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला तेव्हा मोदी लाटेचा फटका त्यांना निश्चितपणे बसला पण त्यानंतर 2019 ला ही मोदी लाटेचा फटका पुन्हा एकदा बसला, आणि परत एकदा त्यांचा पराभव झाला.

तेव्हा मात्र असं वाटले की सोलापूर हे सुशीलकुमार शिंदे यांच्या हातातून निसटते अशा चर्चा रंगू लागल्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी मागणी ही रोहित पवारांनी केली होती. पण प्रणिती शिंदे यांनी “हा गड आपलाच” असे म्हणत त्यांना प्रत्युतर दिले. थोडक्यात काय तर सोलापूर मध्ये पुन्हा काँग्रेसला बळ मिळेल याची चर्चा रंगू लागल्या.

शिंदे घराणं कमबॅक करणार की परत बॅकफूटला जाणार ?

यंदा मात्र सुशील कुमार शिंदे यांनी राजकीय पटलावरून माघार घेत त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. सध्या भाजपवरती सडकून टीका करणार्‍या, प्रणिती शिंदे हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा रंगली खरी, परंतु त्या भाजप विरोधात आक्रमकपणे आपली भूमिका मांडत राहिल्या. याचाच अर्थ प्रणिती शिंदे या काँग्रेसकडूनच उमेदवारी घेऊन निवडणूक लढवणार हे निश्चित झालं. आता सोलापूरची लढाई ही शिंदे घराण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनली आहे.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांचा जर सोलापुरातून पराभव झाला तर मात्र सोलापूर हा शिंदेंच्या हातातून कायमचा जाईल आणि प्रणिती शिंदे यांचे राजकारण सुद्धा बॅकफुटला जाईल अशी भीती निर्माण झाल्यामुळे आणि त्यामुळे कन्येचे राजकारण आणि आपला मतदार संघात स्वतःचा गड वाचवण्याच आव्हान यावेळी सुशील कुमार शिंदे यांच्यासमोर असेल. सध्या सोलापूर लोकसभेत सहापैकी केवळ प्रणिती शिंदे यांचा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ सोडला तर बाकी सगळे मतदार संघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत. यामध्ये चार आमदार भाजपचेच आहेत तर एक आमदार अजित पवार गटाचा आहे त्यामुळे प्रणिती शिंदेना ही निवडणूक अवघड जाईल असं तरी सध्या कागदावरती दिसत आहे.

ncp sharad pawar ajit pawar
ncp sharad pawar ajit pawar

मोहिते पाटील ठरू शकतात हुकमी एक्का !

मग अशावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मदतीने सोलापूरची निवडणूक प्रणिती शिंदे साठी सोपी कशी होऊ शकते हे बघता येईल. सहकाराच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात आपलं वेगळं वर्चस्व निर्माण करणारे घराणं म्हणजे मोहिते पाटील घराणं. शंकरराव मोहिते पाटील यांच्या नंतर त्यांचे पुत्र विजयदादा यांनी सहकाराची चळवळ ही सोलापूरच्या गाव खेड्यापर्यंत पोहोचवली आणि त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचा एक हाती वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं.

विजयसिंह मोहिते पाटील हे जवळजवळ आठ वर्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अध्यक्ष होते. त्यानंतर जवळपास 29 वर्ष ते माळशिरसचे आमदारही राहिलेत आणि त्यामुळेच सोलापूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा चांगलाच जनसंपर्क आहे आणि हा जनसंपर्क सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ते उपयोगात येऊ शकतो. यामुळेच प्रणिती शिंदेंची ताकद निश्चितपणे वाढू शकते.

पण अशातच मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही मराठा बांधवांनी प्रणिती शिंदे यांची गाडी अडवली होती, आणि त्यातूनच मराठा आंदोलन हे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आहेत असा नरेटीव सुद्धा तयार झाला होता. मग अशावेळी मोहिते पाटलांना सोबत घेऊन हा मराठा विरोध कमी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे होऊ शकतो. याशिवाय शरद पवारांची सोलापूर जिल्ह्यावरती चांगलीच पकड आहे. पवारांनी काही वर्षे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवलेले आहे, आणि त्यामुळेच शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या साथीने सोलापूरचा गड सर करण्यासाठी यंदा प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी कंबर कसली आहे असं म्हणता येईल.

माढ्याच समीकरण कस असेल ?ncp sharad pawar ajit pawar

या तिघांच्या एकत्र येण्याने समीकरण बदलू शकते ते म्हणजे माढ्याचं. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार, मंत्री ते अगदी उपमुख्यमंत्री राहिलेल्या मोहिते पाटलांनी जिल्हा दूध संघ, जिल्हा परिषद, कुक्कुटपालन संस्था, डीसीसी, शिवामृत दूध संघ, शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, शंकर सहकारी साखर कारखाना या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपले एक वलय निर्माण केले आहे. “मोहिते पाटील म्हणजेच सबकुछ” असे वातावरण जिल्ह्यात होतं.

पण अजित पवारांनी उभा केलेला समांतर गट, व विरोधात तयार झालेले वातावरण यामुळे मोहिते पाटील गेल्या काही वर्षात बॅकफुटला आले. हळूहळू महाराष्ट्रात सहकारी संस्थांची जी काही बिकट अवस्था झाली त्यात मोहिते पाटलांचा समावेश होता. भाजपमध्ये गेल्यावर मोहिते पाटलांनी हे सगळं सुधारण्याचा प्रयत्न केला करा, पण तरीसुद्धा सरकारी पातळीवरती मोहिते पाटलांचा सुरुवातीसारखा वर्चस्व आता राहिलेला नाही.

पण अशावेळी मोहिते पाटलांना पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करून कमबॅक करायचे आहे असे दिसते. त्यासाठी त्यांनी माळशिरस तालुक्यातील त्यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांना सुद्धा हात मिळवणी करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे, असे सूत्रानुसार समजले. आता जानकर यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर एकीकडे त्यांचे फार पूर्वीचे सहकारी आणि काही प्रमाणात विरोध करणारे सुशीलकुमार शिंदे यांची सुद्धा आज भेट झाली. त्यामुळे आता बेरजेचे राजकारण करून मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील आणि जो कोणी मोहिते पाटलांच्या घराण्यातला उमेदवार असेल त्यांच्यासाठी माढा कसा उपयोगी होईल याचा प्रयत्न करताना दिसतायत.

भाजपला कितपत जड जाऊ शकत ?

आता माढयाचा विचार करायचा तर इथ जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त एस सी मतदार आहेत. अशातच वंचित ने येथे आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठिंब्याने मोहिते पाटलांना दलित मत पदरात पाडून घ्यायची आहेत असं चित्र दिसतं. माढ्यात सध्याच्या परिस्थितीला महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही, त्यामुळेच विजयसिंह मोहिते पाटील सध्या शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, उत्तम जानकर यांच्यासारख्या नेत्यांना जुळवून घेत माढ्यात ताकद वाढवण्याचे काम करताना दिसत आहेत.

शरद पवारांची सुद्धा माढ्यामध्ये कागदावर ताकद दिसत नसली तरी आज राज्यभरात भाजप विरोधी वातावरण तयार होतय, त्यामागे “पवारांच्या तुतारीच्या मागे उभे राहा” असं वातावरण तयार केले जात आहे. माढा मतदार संघाची स्थापना झाल्यानंतर माढ्याचे पहिले खासदार होण्याचा मान शरद पवारांना मिळाला त्यावेळी अकलूजकरांनी त्यांना मदत केली होती आणि त्यामुळेच आता त्यास मदतीची परतफेड शरद पवार करत आहेत असे चित्र दिसत आहे. शरद पवार वार्‍याची दिशा ओळखतात असे म्हणतात त्यामुळेच माढयामध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते पाटलांच एकत्र येण भाजपला अवघड जाऊ शकत.

शिंदे घराण्यासाठी अस्तित्वाची लढाई की आणखी कोणती नवी खेळी ?

या तिन्ही नेत्यांच्या एकत्रित येण्यामागच मुख्य कारण म्हणजे “अस्तित्वाची लढाई”. विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांचे वितृष्ट संबंध सर्व सोलापूर जिल्ह्याला माहित आहेत. सुरुवातीपासूनच मोहिते पाटील यांच्याकडे सोलापूर ग्रामीण भागाचा कारभार होता तर शहरात मात्र सुशीलकुमार शिंदे हेच प्रमुख नेते होते. समकालीन राजकारण असणाऱ्या नेत्यांमध्ये असणारा सत्ता संघर्ष हा महाराष्ट्रला नवीन नाही. शरद पवारांनी देखील या दोन्ही नेत्यांमधील सुप्त संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न कधी केला नाही, पण जसा काळ गेला तशी या दोन्ही नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली. 2009 ला विजयसिंह मोहिते पाटील हे विधानसभेला तर सुशीलकुमार शिंदे लोकसभेला पराभूत झाले. 2014 ला विजयदादा निवडून आले असले तरी तो त्यांच्या दबदबा निश्चितपणे कमी झाला होता आणि म्हणूनच यंदा 2024 मध्ये प्रणिती शिंदे यांना निवडून आणणं या तिन्ही नेत्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण बनल आहे. दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घराण्यातल्या कोणत्याही उमेदवाराला निवडून आणण हेच दोन्ही नेत्यांचा अंतिम ध्येय असेल.

शरद पवारांची खेळी यशस्वी होणार?

शरद पवार ही आता या दोघांच्याच समेट घडून आणत आहेत, कारण त्यांच्यासाठी सुद्धा अजित पवारांच्या बंडा नंतर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे जुने पत्रकार सांगतात की शरद पवार विरुद्ध विजयसिंह मोहिते पाटील हा संघर्ष जरी समोर दिसत असला तरी मुळातला हा वाद अजितदादा मुळेचं होता. अजित पवारांनी मोहिते पाटलांच्या विरोधात तयार केलेल्या समविचारी आघाडीमुळे मोहिते पाटील हे शरद पवारांपासून दुरावत गेले. आत्ताही तेच अजित पवार लांब गेल्याने शरद पवार हे आता जुन्या लोकांना जोडून घेतायेत आणि त्यातलेच मोहिते पाटील सुद्धा हे आहेत. आता या तिघांच्या भेटीचा आणखी एक महत्त्वाचं कारण देता येईल ते म्हणजे आगामी विधानसभेसाठी असणारी तयारी. शरद पवार हे दूरदृष्टीचे नेते म्हणून जाणले जातात याचा प्रत्येय तर यापूर्वी अनेकदा आलाच आहे. बारामतीमध्ये अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना त्यांनी आता जोडून घ्यायला सुरुवात केली आहे.

नाराज नेत्यांच शरद पवारांना साकड –

आता देखील शरद पवारांना सोलापूर मधील या दोन्ही नेत्यांना एकत्रित आणण्यात त्यांचा दुसरा हेतू असू शकतो की तो म्हणजे, ज्या पद्धतीने महायुतीत तिकीट न मिळालेले धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्यासारखे अनेक जण हे लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या हाताला लागले आहेत. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा अनेक इच्छुक नेते जे नाराज असतील ते शरद पवारांकडे येऊ शकतात. उदाहरण द्यायचं तर मोहोळ विधानसभेसाठी तिथून माजी आमदार राजन पाटील यावेळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे अजित पवार गटाचे उमेश पाटील जे की राजन पाटलांचे विरोधक आहेत आणि तेही इच्छुक आहेत.

आता उत्तम जानकर सुद्धा माळशिरस मध्ये इच्छुक आहेत, पण तिथून भाजपचे सुद्धा अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत जे चित्र माढा लोकसभेबाबत दिसलं ते चित्र पुन्हा पाहायला मिळू शकत. इच्छुकांची आणि नाराजींच्या गर्दी होऊ शकते आणि अशावेळी या नाराज नेत्यांना आपल्या सोबत घेण्याची खेळी या माध्यमातून शरद पवार करताना दिसून येत आहेत.

तर हा विषय थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचा म्हटलं तर तीन मोठ्या आणि वरिष्ठ नेत्यांची आज झालेली बैठक म्हणजे सोलापूर आणि माढ्याच चित्र बदलणारी बैठक असेल असं म्हणता येईल, पण ही बैठक इतक्या पुरतीच मर्यादित आहे का? तर निश्चितच नाही. याचे पडसाद विधानसभेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. तुम्हाला काय वाटतं या तीन मोठ्या नेत्यांच्या एकत्रित येण्याने भाजपचं टेन्शन वाढू शकत? की भाजप अजून कोणती नवीन खेळी करू शकतो? तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा आणि अशाच घडामोडी साठी आपल्या वेबसाईट वरती नवनवीन माहिती पहा !!