महाराष्ट्र लेक लाडकी योजना : आपल्या मुलीसाठी या योजनेतून 1 लाख रुपये कसे मिळवाल | अर्ज कसा करायाचा पहा!!| Lek Ladki Scheme

Lek Ladki Scheme

आपल्या महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 2023 पासून ज्या जन्मलेल्या मुलींना “लेक लाडकी” या योजनेअंतर्गत आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

त्यानुसार लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली.

तर या लेखांमध्ये आपण नेमकी लेक लाडकी योजना ही काय आहे हे पाहणार आहोत. कुणाला या योजनेचे लाभ होणार आहे व किती लाभ होणार आहे,अर्ज कुठे करायचा,कसा करायचा,याचे फायदे काय अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत तर पुढे पाहूयात!!

It was announced that girls born in our state of Maharashtra from April 1, 2023 will be given Rs 1 lakh 1 thousand each as financial assistance under the scheme “Lake Ladki”.

Accordingly, applications were started from all over the state under the Lake Ladki scheme.

So in these articles we are going to see what exactly is Lake Ladki Yojana. Who is going to benefit from this scheme and how much will be benefited, where to apply, how to do it, what are the benefits of this, we will see detailed information in these articles, let's see further!!
lek ladki scheme (2)
lek ladki scheme (2)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेत आर्थिक वर्षकाठीचा अर्थसंकल्प मांडला होता. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाची घोषणा केली होती.यामध्ये लेक लाडकी ही योजना अत्यंत लक्षवेधी व महत्वपूर्ण ठरली. लेक लाडकी या योजनेच लाभ राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांनसाठी महत्वाची ठरणार आहे.लेक लाडकी या योजनेचा लाभ हा पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे.

यातील ज्या कुटुंबच वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असेल अश्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ज्या कुटुंबाचे रेशन कार्ड पिवळ्या व केशरी रंगाचे आहेत त्या कुटुंबातल्या लाभार्थी मुलीला जन्मानंतर 5 हजार रुपये, त्यानंतर ती मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावरती 6 हजार रुपये,मग सातवीत असताना 7 हजार रुपये व अकरावीत असताना 8 हजार रुपये अनुदान देण्यात येईल आणि त्यानंतर त्या लाभार्थी मुलीचे वय एकूण 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या लाभार्थ्या मुलीला एकूण 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.अस स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी केल.

देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री )

Lek Ladki Scheme | लेक लाडकी या योजनेचा मुख्य उद्देश काय?

महाराष्ट्र राज्य शासनाने विधानसभेत नुकतीच लक्षवेधी व महत्वपूर्ण योजनेची घोषणा केली, ती म्हणजे लेक लाडकी योजना. तर या लेक लाडकी या योजनेचा मुख्य उद्देश असा की, मुलींचे आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षमीकरण करणे. मुलीचे जन्मदर वाढले पाहिजेत व जास्तीत जास्त मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या पाहिजेत या साठी त्यांना आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माझी कन्या या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी ही योजना नुकतीच सुरू करण्यात आली. तर या योजनेचा लाभ कधी आणि कसा मिळणार, योजनेच्या पात्रता अटी कोणत्या, या योजनेसाठी लाभर्थ्याची निवड कशी होणार, अर्ज कुठे व कसा करायचा, अर्ज केल्यानंतर पुढे काय करायच या सर्व गोष्टी आपण या लेखात पाहणार आहोत.

Lek Ladki Scheme | लेक लाडकी योजनेचा लाभ कधीपासून मिळणार?

लेक लाडकी योजनेचा लाभ कधीपासून मिळणार याविषयी बोलताना  महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे  यांनी असे स्पष्टीकरण दिलं की,

लेक लाडकी या योजनेसाठी सर्व स्तरावरून अर्ज आणि प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आम्ही जिल्हास्तरावर केलेल्या आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन झाल्यानंतरच या योजनेचा लाभ द्यायला सुरुवात केली जाईल.आता आम्ही पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी 125 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे हा निधी एकदा का प्राप्त झाला त्यानंतर लगेचच या योजनेचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात येईल.

अदिती तटकरे (महिला व बाल विकास मंत्री )

Lek Ladki Scheme |लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत?

लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी असणार आहेत त्यामुळे त्या अटीनुसार पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ घेता येईल. तर या योजनेसाठी पात्रतेचे निकष अशा प्रकारे की,

लेक लाडकी या योजनेसाठी सध्यातरी फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांनाचं या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

ज्या कुटुंबाचे रेशन कार्ड पिवळ्या व केशरी रंगाचे आहेत त्या कुटुंबातल्या लाभार्थी मुलीला जन्मानंतर 5 हजार रुपये, त्यानंतर ती मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावरती 6 हजार रुपये,मग सातवीत असताना 7 हजार रुपये व अकरावीत असताना 8 हजार रुपये अनुदान देण्यात येईल आणि त्यानंतर त्या लाभार्थी मुलीचे वय एकूण 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या लाभार्थ्या मुलीला एकूण 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.

 अशाप्रकारे ही एकूण एक लाख एक हजार रुपये देण्यात येणारी लेक लाडकी योजना आहे.

 राज्यातील एकूण सुमारे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल असं सांगितलं ही जात आहे.

Lek Ladki Scheme |लेक लाडकी या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड कशी होणार?

ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना लागू असल्यामुळे ही योजना 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल त्यामुळे एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोनच मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

जेव्हा पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना त्या मुलींच्या आई व वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे हे अनिवार्य राहील.

जेव्हा महिलेच्या दुसऱ्या गर्भधारणे वेळी त्या महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला तर त्यातील एका मुलीला किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र त्यानंतर महत्त्वाची अट अशी की त्या माता /पित्याने आपले कुटुंब नियोजन यासाठी म्हणून शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

जर का समजा, त्या माता /पित्यांना 1 एप्रिल 2023 पूर्वी जर एकचं मुलगा किंवा एकच मुलगी असेल व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा त्या जुळ्या मुलींना ही योजना स्वतंत्रपणे त्यांना लागू होईल.

या योजनेसाठी महत्त्वाची पाचवी अट म्हणजे लाभार्थी कुटुंब हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.

त्या लाभार्थी कुटुंबाचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.

तसेच त्या लाभार्थी कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करायचा? |Lek Ladki Scheme

लेक लाडकी या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकीकडे जाऊन या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.

अर्ज कसा करायचा तर खाली दिल्याप्रमाणे हा अर्जाचा नमुना आहे. याच फॉरमॅटमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज कसा करण्यात यावा यासाठी हा शासन निर्णयात हा फॉरमॅट दिलेला आहे.

एका साध्या कागदावर ही लिहून तुम्ही अर्ज सादर करू शकता.

lek ladki scheme -लेक लाडकी योजनेसाठी अर्ज असा करा
lek ladki scheme -लेक लाडकी योजनेसाठी अर्ज असा करा

या अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती असेल जसे की लाभार्थीचे नाव, आधार क्रमांक, लाभार्थीच्या आई-वडिलांचे नाव, त्यांचे आधार क्रमांक, मोबाईल नंबर, त्यांचा ईमेल आयडी, कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पत्ता, एकूण अपत्य किती, तुमचे बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील अर्ज केला ते लिहायचं आहे. त्यासोबतचं तारीख व ठिकाण टाकून सही करायची आहे.

आणि एकदा का हा अर्ज करून झाला की लगेच अंगणवाडी सेविकेकडून याची पोचपावती घ्यायला मात्र विसरू नका.

लेक लाडकी या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे? |Lek Ladki Scheme

  • लाभार्थीचा जन्म दाखला
  • कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे, त्यापेक्षा जास्त नसावे.)
  • लाभार्थीचे आधार कार्ड ( प्रथम लाभावेळी ही अट आवश्यक्य राहील )
  • पालकाचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत 
  • रेशन कार्ड ( पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड चे झेरॉक्स प्रत )
  • मतदान कार्ड
  • शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र ( याची गरज जर पहिल्या मुलीनंतर दुसऱ्या गर्भधारणे वेळी एक किंवा जुळ्या मुली झाल्या तेव्हा त्या दोन्ही जुळ्या मुलींना याचा लाभ घेऊन देण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्राची आवश्यकता राहील )

लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर पुढे काय? |Lek Ladki Scheme

आता अर्ज तर केला पण पुढे काय? तर नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे आपण या योजनेसाठी अर्ज केलेला तो अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घ्या, तपासून झाल्यानंतर ना त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे.

त्यानंतरन तो अर्ज संबंधित असणाऱ्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे.

मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे तो अर्ज पाठवायचा आहे.

मग त्यानंतर येत प्रशासकीय यंत्रणेचे काम, प्रशासकीय यंत्रणेला दोन महिन्याच्या आत त्या अर्जावर कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक्य राहील.

प्रशासकीय यंत्रणेचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि एकदा का लाभार्थी निश्चित झाला की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट त्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.