Covidshield Vaccine मुळे खरचं गंभीर आजार होतोय का? कंपनीचे यावर दावे काय? | Astrazeneca Vaccines

Astrazeneca Vaccines :

कोरोना काळात आपल्यापैकी सर्वांनीच कोरोनाची लस घेतली असणार. काहींनी कोविड शील्ड (Covid Shield) ही लस घेतली तर काहींनी Co-Vaccine ही भारतीय बनावटीची लस घेतली असणार आहे. कोरोना काळात तयार करण्यात आलेल्या या लसी तेव्हा जीवनदान ठरल्या होत्या. एखादी लस तयार करण्यासाठी साधारणतः दहा वर्षाचा कालावधी लागतो. लस तयार करून त्याची ट्रायल घेताना साईड इफेक्ट्स तपासणे अशी मोठी प्रक्रिया असते. त्यामुळेच लस तयार करणे ही एक वेगळी प्रक्रिया आहे. पण कोरोना काळात उद्भवलेली स्थिती लक्षात घेता लवकरात लवकर लस तयार करणे हे गरजेचं होतं व त्या काळाची गरज ही होती. त्यामुळे फक्त एका वर्षात लस तयार करून ती नागरिकांना देण्यात आली. मात्र ज्या वेगात लस तयार करण्यात आली होती त्याबद्दल अनेकांनी यावर शंका व्यक्त केली होती. ही लस परिणामकारक असणार नाही असे देखील बोलले गेलं पण कोरोना रोखण्यात आलेले यश पाहता आतापर्यंत तरी लस परिणामकारक असल्याचं दिसून येत होतं.

मग आपण आज-काल या लशीचीच चर्चा का करतोय, तर कोरोना काळात तयार करण्यात आलेल्या Astra Zeneca एका कंपनीच्या कोविड शील्ड लस विरोधात ब्रिटनमधील एका कोर्ट मध्ये केस दाखल करण्यात आली आहे. या खटल्यात युक्तिवाद करताना Astra Zeneca कंपनीने कोविड शील्ड लसीमुळे काही दुर्मिळ साईड इफेक्ट होऊ शकतात हे मान्य केले आहे. त्यामुळे या कोविड शील्ड लसीच्या परिणामकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पण नक्की हे प्रकरण आहे तरी काय ? कोविड शील्ड लसीवरती वरती नक्की काय आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे नक्की कोणते साईड इफेक्ट्स आहेत हे पाहूयात या माहितीमधून.

या प्रकरणाची नेमकी सुरुवात कशी झाली ते पाहुयात ? |Astrazeneca Vaccines

नमस्कार, भरती मेळावा च्या या नव्या माहितीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सुरुवातीलाच या प्रकरणाची सुरुवात कशी झाली ते पाहूयात. जेम्स स्कॉट या ब्रिटिश नागरिकांनी सर्वात आधी या प्रकरणात ब्रिटनमध्ये केस दाखल केली. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना Astra Zeneca या स्वीडिश आणि मूळ ब्रिटिश असलेल्या कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने कोरोनाची लस तयार केली होती.

जगातील सर्वात मोठा लस पुरवठादार असलेल्या पुण्यातील सिरम (SERUM) इन्स्टिट्यूट मध्ये याची निर्मिती करण्यात आली. जगभरातील ही लस कोविड शील्ड या नावाखाली विकण्यात आली. स्कॉट यांनी एप्रिल 2021 मध्ये ही लस विकत घेतली होती. त्यानंतरन स्कॉट यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन रक्ताच्या गाठी तयार व्हायला लागल्या. यामुळेच त्यांच्या मेंदूला कायमची दुखापत झाली. त्यांनी असा दावा त्यांनी केलाय त्यांना ही दुखापत कोरोना लस घेतल्यानंतर झाली आहे. त्यामुळेच त्यांनी या विरोधात कोर्टात दाद मागितली आहे.

ब्रिटनमध्ये अशा प्रकारचे 51 खटले सुरू आहेत. या सर्वांनी कोविड शील्ड लसीमुळे त्यांना कायमची दुखापत झाल्याचे दावा केला आहे. या सर्वांनी एकत्र येऊन Astra Zeneca कंपनीवर 100 मिलियन पाउंड भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झालं तर जवळपास १०५० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. आता हा खटला जवळपास एक वर्ष जुना आहे, पण तो आता चर्चेत का आलाय. आता कोरोनाच्या लसीमुळे कायमची दुखापत झाल्याचे आरोप पहिल्यांदा होत नाहीयात.

Astrazeneca Vaccines
Astrazeneca Vaccines

Covidshield Vaccine मुळे नेमका कोणता आजार होतोय ? |Astrazeneca Vaccines

यापूर्वी सुद्धा अनेकांनी कोरोनाच्या विविध लसींवर शंका व्यक्ति केली आहे. पण या प्रकरणात नव्याने घडलेली गोष्ट म्हणजे कोविड शिल्ड लस तयार करणाऱ्या कंपनीने Astra Zeneca या कंपनीनचे त्यांच्या कंपनीची कोरोनाची लस घेतल्यानंतर अत्यंत दुर्मिळ केसेस मध्ये लस घेणाऱ्या व्यक्तीला TTS होत आहे अर्थात Thrombosis with Thrombocytopenia Syndrome अस होऊ शकतो असा मान्य केलाय. एखाद्या कंपनीने त्यांच्या लसीमुळे एखादा आजार होऊ शकतो हे मान्य करणे मोठी गोष्ट असल्याचं म्हटलं जात आहे.

मे 2023 मध्ये Astra Zeneca ने स्कॉट यांना पत्र पाठवून कोविड शील्ड लसीमुळे साधारणतः TTS आजार होत नाही असे मान्य केलं होतं. मात्र आता वर्षभरात कंपनीने आपले भूमिका बदलून दुर्मिळ केसेस मध्ये कोविड शील्ड मुळे TTS हा आजार होऊ शकतो हे मान्य केला आहे. याशिवाय हार्ट-अटॅक ( Heart Attack ) आणि ब्रेन हॅमरिंग ( Brain Hamring ) ची शक्यता देखील बोलून दाखवली आहे. आता हे TTS काय असतं आणि त्यामुळे नक्की काय होतं. तर TTS अर्थात Thrombosis with Thrombocytopenia Syndrome हा एक दुर्मिळ आजार आहे.

Thrombosis म्हणजे शरीरात रक्ताची गाठ तयार होणे. आता ही गाठ शरीरातील कोणत्या अवयवाच्या रक्त वाहण्यांमध्ये तयार होऊ शकते. जसे की मेंदूच्या किंवा फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्या आता ही गाठ तयार झाली तर नक्की काय होतं. ज्या अवयवाला रक्त वाहून देणारा रक्तवाहिन्या आहेत त्यांच्या नॉर्मल कामांमध्ये बिघाड होते. जसे की गाठ फुफ्फुसात तयार झाली तर श्वसनाचा त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. हीच मेंदूमधील रक्तवाहिन्यात झाली तर झटके येणे, बेशुद्ध होणे आणि काही प्रमाणात अंशतः आणि किंवा पूर्णतः पॅरालिसीस देखील होऊ शकतो.

Covid Shield लसीमुळे नेमके कोणते साइडइफेक्ट होतायेत ? |Astrazeneca Vaccines

कोविड शील्ड या लसीचे याशिवाय अजून कोणते साईड इफेक्ट्स असू शकतात, याबद्दल कंपनीने काय माहिती दिली आहे तेही पाहूयात. विशेषत कोविड शील्ड लसीमुळे येणाऱ्या साईड इफेक्ट्सचे असे पाच प्रकार आहेत. यामध्ये पहिला प्रकार आहे वेरी कॉमन साईड इफेक्ट ( Very Common Side Effects ) ज्यामध्ये ज्या ठिकाणी इंजेक्शन दिलं जातं त्या ठिकाणी खाज सुटणे, अस्वस्थ वाटणे, थकवा, थंडी आणि ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, किंवा मसल्स दुखणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. पण ही लक्षणे दहापैकी फक्त एका व्यक्तीमध्ये दिसण्याचे दावा कंपनीने केला आहे.

यानंतर दूसरा प्रकार येतो तो म्हणजे कॉमन साईड इफेक्ट (Common Side Effects ). यामध्ये जिथे इंजेक्शन दिलं जातं तिथे सूज किंवा लालसरपणा, ताप येणे, मळमळणे किंवा उलटी होणे, पाय किंवा हात दुखणे, फ्ल्यू सारखी लक्षणे असो की ताप येणे, घसा खवखवणे, खोकला किंवा सर्दी होणे अशी लक्षणे दहापैकी एका व्यक्तीला लस दिल्यानंतर दिसू शकतात.

यानंतरचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अन कॉमन साईड इफेक्ट (Uncommon Side Effects ). यामध्ये चक्कर येणे, पोटात दुखणे, जास्त घाम येणे, त्वचेला खाज येणे यासारखी लक्षणे शंभर मधून एखाद्या व्यक्तीला दिसू शकतात असा कंपनीचा दावा आहे.

यानंतरचा चौथा साईड इफेक्ट आहे तो म्हणजे रेअर साईड इफेक्ट (Rare Side Effects ). यामध्ये प्लेटलेट कमी होणे, ज्याला सर्वसाधारणपणे Thrombocytopenia म्हटलं जातं किंवा रक्त गोठणे ज्याला Thrombosis असं म्हटलं जातं. यासारखे आजार व क्वचितच आढळून आलेत. एक लाख व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात असा कंपनीचा दावा आहे किंवा कंपनीने असे सांगितले आहे.

यानंतर काही साईड इफेक्ट्स माहिती नसल्याचे देखील कंपनीने म्हटले आहे. याशिवाय Astra Zeneca कंपनीने दिलेली साईड इफेक्ट ची इतकी माहिती पाहिली तर असे लक्षात येते की कंपनीने Thrombosis आणि Thrombocytopenia Syndrome या साईड इफेक्ट बद्दल माहिती दिलेली आहे. पण कंपनीने Thrombosis with Thrombocytopenia Syndrome याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मात्र आता कोर्टात खटला सुरू असताना कंपनीने दुर्मिळ केस मध्ये TTS आजार होऊ शकतो हे मान्य केल आहे.

भारतावर याचे नेमके कोणते परिणाम होणार ?|Astrazeneca Vaccines

आता ज्या Astra Zeneca कंपनीच्या लसी विरोधात कोर्टात खटला सुरू आहे. त्या लसीचे भारतात जवळपास 175 कोटी डोस देण्यात आलेले आहेत. त्यानंतर भारतात तयार करण्यात आलेल्या Co-Vaccine चे डोस देण्यात आलेले आहेत. त्यामुळे भारतात देखील या प्रकरणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण भारतात अजून तरी या प्रकरणात कोविड शील्डच्या साईड इफेक्ट मुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची किंवा साईड इफेक्ट झाल्याच्या केसेस अजून तरी नोंदवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भारतातील नागरिकांवर त्याचा कशा प्रकारे परिणाम झाला आहे याबद्दल मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक अभ्यास झाल्याचे आढळून येत नाही.

पण आता ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या खटल्यामुळे कोरोनाच्या साईड इफेक्ट्स बद्दल पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणात ब्रिटनमधील कोण काय निर्णय देतो आणि त्याची भारतीय कोर्ट कशी दखल घेतो हे पाहण देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. या लसीचा आपल्या भारतीयांवर काय परिणाम होऊ शकतो हे पाहावं लागेल.

या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. तुम्ही कोरोनाची लस घेतली आहे का घेतली असेल तर कोणती घेतली आहे कोविड शील्ड की को वॅक्सिन घेतली आहे आणि आणि घेतली असेल तर त्याचे काही साईड इफेक्ट्स जाणवले का? तुमचे याबद्दचे मत नक्कीच स्पष्ट करा आणि अशा प्रकारची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपल्या भरतीमेळावा ला भेट द्या..