प्रीती झिंटा ने त्याला चुकून टीम मध्ये घेतलं होतं पण तोच झाला पंजाबचा स्टार | ipl auction 2024

ipl auction 2024:

चार महिने आधीच म्हणजे डिसेंबर महिन्यातला किस्सा आहे. आयपीएलची Auction सुरू होती. प्लेयर ची नावे यायची होती. कोटींचे आकडे फुटायचे होते आणि प्लेयरची चांदी व्हायची होती. कुठल्याही प्लेयरचं नाव आलं की कॅमेरा टीमच्या मालक लोकांवर फिरायचा. सगळे ओळखीचे चेहरे त्यात दिसायचे पण, एक चेहरा दिसला की कॅमेरामन इथेच थांबावा असं वाटायचं. कारण तो चेहरा असायचा प्रीती झिंटाचा. IPL सुरू झाल्यापासून जशी RCB ने एकही ट्रॉफी जिंकली नाही, तशीच पंजाबनेही जिंकली नाही पण त्यांची माप कोणी काढत नाही, कारण मॅच हरू किंवा जिंकू गालावरची खळी खुलवत प्रीती झिंटा स्टॅन्ड मध्ये बसलेली दिसते. प्रीती झिंटाचा विषय निघाला की मेन मुद्दा भरकटतोय अस वाटायच, कारण चेहरा असायचा प्रीती झिंटाचा. कारण आपण होतो ऑप्शन मध्ये काय झालं या विषयावर.

Auction मध्ये Accelerated Round नावाचा एक विषय असतो. ज्यात ऑक्शन मध्ये कोणीच बोली न लावलेल्या प्लेअरचे नाव स्पीड मध्ये घेतले जातात. त्यांना दुसरा चान्स दिला जातो. ऑक्शनर मल्लिका सागरने शशांक सिंह हे नाव घेतलं. वीस लाख बेस्ट प्राईस होती आणि प्रीती झिंटा ने त्याला टीम मध्ये घेतलं. सोल्ड टू पंजाब किंग्स हा आवाज आला, हातोडी पडली आणि नेसवाडी आणि प्रीती झिंटा मध्ये बोलणे सुरू झाल. त्यांनी मल्लिका सागरला खुणावलं की, आम्ही चुकीचा प्लेयर घेतलाय. आम्हाला दुसऱ्या शशांक सिंह वर बोली लावायची होती त्याला परत घ्या. आता एकदा सोल्ड झालेला प्लेयर ऑप्शन मध्ये परत टाकता येत नाही. त्यामुळे शशांक सिंहाची लिटरली चुकून पंजाबच्या टीम मध्ये निवड झाली. 26 एप्रिल ची मॅच पंजाब विरुद्ध कोलकत्ता. कोलकत्याने 261 रन्स काढले. आयपीएलच नव्हे तर T-20 क्रिकेटमध्येही एवढे टार्गेट कोणी चेस केल नव्हतं पण पंजाबने केलं. मॅच जिंकवणारी सिंगल काढली ती शशांक सिंहने. तोच शशांक सिंह ज्याला प्रीती झिंटा ने चुकून टीम मध्ये घेतलं होतं.

चार महिन्यात आणि नऊ मॅचेस मध्ये असं काय बदललं ज्यामुळे शशांक सिंह फक्त पंजाबचाच नाही तर आयपीएलचा स्टार बनलाय. शशांक आहे कोण आणि त्यान आपल्याला मिळालेला दुसरा चान्स कसा गाजवला हे पाहूयात या माहिती मधून. नमस्कार भरती मेळावा च्या नव्या माहिती मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शशांक सिंह चे क्रिकेटमधील धमाकेदार एन्ट्री ची गोष्ट.

ipl auction 2024
ipl auction 2024

शशांकचा क्रिकेट मधील एकूण प्रवास कसं होता ?| ipl auction 2024

शशांक सिंह चे वडील IPS ऑफिसर आहेत. त्याच्या वडिलांनी 1996 च्या वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये भारताला हारताना बघितलं होतं आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाला क्रिकेटर बनवायचं. शशांकने प्रॅक्टिस ही सुरू केली. मध्य प्रदेश सोडून तो याच्या एजग्रुप ला क्रिकेट खेळायचा, पण अचानक वडीलांची मुंबईमध्ये अचानक बदली झाली आणि त्याला मुंबईत यावं लागलं.

मुंबईत आल्यावर त्याचा खरा स्ट्रगल सुरू झाला. लोकल मधून भली मोठी किट बॅग घेऊन प्रवास करायचा. जिथे मॅच असेल ते मैदान गाठायचं आणि खेळायचं. शशांकच नाव मुंबई क्रिकेटच्या सर्कलमध्ये चर्चेत आलं ते कांगाली मुळे. लांब लांब सिक्स मारणारा प्लेयर म्हणून त्याची हवा झाली होती. 2015 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी त्याला मुंबईच्या वाईडबॉल टीम मध्ये संधी मिळाली पण रणजी ट्रॉफी च्या टीम मध्ये चान्स मिळाला नव्हता. सूर्यकुमार यादव, श्रेयश अय्यर, सिद्धेश लाड, पृथ्वी शॉ असे प्लेयर असताना शशांचं नाव पहिल्या 15 प्लेयर च्या लिस्टमध्येही येत नव्हतं. वय वर्ष 28 झालं पण शशांक सिंह एकही रणजी मॅच खेळला नव्हता. तो मुंबईचे मैदान गाजवत होता. इकडून तिकडे खेळण्यासाठी पळत होता पण शशांकला चान्स मिळत नव्हता.

त्यांनी पॉंडिचेरीला जाण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्या टीम मध्ये ही त्याचं लक लागल नाही. पहिला चान्स घेतला तो हुकला. शशांकच्या वडिलांनी त्याच्यापुढे स्पर्धा परीक्षा देण्याचा पर्याय ठेवला पण त्याने क्रिकेटमध्ये दुसरा चान्स घ्यायचा ठरवलं.

दूसरा चान्स ते IPL स्टार !| ipl auction 2024

दुसर्‍या चान्स मध्ये रणजी सीजनला त्याने छत्तीसगड मधून खेळायचा निर्णय घेतला. शशांकला मिळालेला हा दुसरा चान्स जो त्यान गाजवला. छत्तीसगडच्या टीम मध्ये त्याला सेटल व्हायलाच वेळ लागला. एक तर सगळे दिवस हॉटेलवर राहून काढायचे. शशांक ओपनर म्हणून किंवा टॉप ऑर्डर बॅटर म्हणून खेळायला होता, पण येथेच त्याच्यापुढे फक्त फिनिशर म्हणून खेळण्याचा पर्याय होता. त्याने तो निवडला. रणजी क्रिकेटमध्ये चांगली बॅटिंग केली आणि मग विजय हजारे ट्रॉफीची मॅच होती. मुंबई विरुद्ध छत्तीसगड. त्या मॅच आधी छत्तीसगड मुंबईला कधीच सीनियर लेवलला हरवलं नव्हतं, पण त्या मॅच मध्ये ते जमलं. हिरो ठरला होता आपला शशांक सिंह. खरंतर शशांक बॅटिंगला आला तेव्हा सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सरफराज ही सगळे त्याला कमी लेखत होते, पण शशांक खचला नाही. त्याने 318 च टार्गेट चेस करताना 40 रन्सची महत्त्वाची इनिंग खेळली आणि छत्तीसगड जिंकलं. मुंबई विरुद्धच्या मॅच मध्ये शशांकने त्याचं सोनं केलं. मग आली IPL. वडिलांचे स्वप्न, मध्यप्रदेश मधली प्रॅक्टिस, कांगाली, मुंबईची मैदान आणि न मिळालेला चान्स, सगळं काय घडलं, कसं आठवलं शशांकला.

शशांक सिंह ची IPL मध्ये निवड कशी झाली ?| ipl auction 2024

दिल्ली कॅपिटल्स मध्ये निवड झाली पण एकही मॅच खेळायला मिळाली नाही. शशांक ची राज्यस्थान रॉयल्स मध्ये निवड झाली पण तिथेही त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नाही. मग 2022 मध्ये त्याला सनरायझर्स हैदराबादने त्याला टीम मध्ये घेतलं. तो दिल्ली कॅपिटल च्या विरुद्धच मैदानात उतरला आणि पहिल्याच बॉलला फोर मारली.

मग लॉकी फर्ग्युसनला सलग तीन सिक्स मारले. 6 बॉल 25 रन्सच्या इनिंगमुळे रातोरात स्टार झाला आणि त्यानंतर त्याला आणखी चार मॅचेस मध्ये बॅटिंग करण्याचा चान्स मिळाला. सनरायझर्स हैदराबादने ही त्याला रिटर्न केलं नाही. 2023 च्या सिझनला तो अनसोल्ड राहिला. 2024 मध्ये पुन्हा त्याचं नाव Auction मध्ये आलं आणि पहिल्याच राऊंडला unsold झाला पण speed राऊंडमध्ये पुन्हा एकदा शशांक सिंह हे नाव पुकारल गेलं. पंजाब ची टीम 19 वर्षाच्या दुसऱ्या शशांक सिंह साठी इच्छुक होती, पण नाव सारखं असल्याने त्यांनी या 32 वर्षाच्या शशांक सिंहला टीम मध्ये घेतलं.

आपल्या कडून चूक झाली अस तर त्यांनाही जाणवलं, पण आता सारवासारव करण्याशिवाय पर्याय उरला न्हवता. शशांकला दुसरा चान्स मिळाला. चुकून का होईना पण मिळाला. अर्थात त्याला खेळायची संधी मिळेल काय यावर प्रश्नचिन्ह होताच, पण IPL च्या आधी झालेल्या DY Patil लीग मध्ये पंजाबचा कॅप्टन शिखर धवन ने शशांकच्या नेतृत्वाखाली खेळला. त्यान शशांकचा अंदाज घेतला आणि त्याला एकच गोष्ट सांगितली की, तू पहिल्या पासून टीम मध्ये खेळशील.

पंजाबला जिंकवत राहिला आणि रातोरात स्टार झाला !| ipl auction 2024

पहिली मॅच सुरू झाली. शशांक पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. पंजाबला वाटलं खूप महागात पडणार, पण शशांकची स्टोरी दुसऱ्या चान्स मध्ये भारी होत असते आणि ती झाली. गुजरात विरुद्धची मॅच, 200 रन्सचा टारगेट होतं. पंजाब ची अवस्था 4 आउट 70 रन्स आणि शशांकन नॉट आऊट 61 मारत मॅच फिनिश केली. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यांनी नॉट आऊट 46 मारलं, पण मॅच फक्त 2 रणांनी हुकली. मुंबई विरुद्ध 41 मारत हार्दिक पांड्याला मागे टाकलं होतं. आता कोलकत्ता सोबत जॉनी बेअरस्टो सोबत थांबून विषय एंड करून टाकला. फिनिशर म्हणून त्यांन स्वतःला सिद्ध केलं. शांत डोकं ठेवून, जबाबदारी ओळखून खेळत राहिला. भले समोर कुठलाही बॉलर असो पंजाबला जिंकवत राहिला.

पंजाबने ऑक्शन मध्ये फक्त पैसा खर्च केला भारी प्लेयर घेतले नाहीत, अशा टीका झाल्या. ज्यान खोटं ठरवल्या तो म्हणजे दुसरा चान्स मिळालेल्या शशांक सिंह मूळ त्या खोटा ठरल्या. चुकून टीम मध्ये घेतलेल्या शशांक सिंह मुळे सर्व वातावरण शांत झालं. शांत डोकं ठेवून जबाबदारी ओळखून तर तो खेळत राहिला.

शशांक सिंहचा पुढील प्रवास कसा असेल ?| ipl auction 2024

पण हा दुसरा चान्स आता शशांक सिंहला कुठवर घेऊन जातो हे बघावं लागेल. वयाच्या 32 व्या वर्षी त्याला टीम इंडिया मध्ये संधी मिळेल का ? का तो निव्वळ IPL पुरताच मर्यादित राहील का ? अशा चर्चाही होतात, पण वय मॅटर करत नाही बॉस, हे सूर्यकुमार ने दाखवून दिलंय. आता टेक्निकली जास्त करेक्ट असलेला, वेळ पडलीस तर बॉलिंग करू शकणारा आणि विश्वास ठेवता येईल असा फिनिशन म्हणून शशांक पुढे येतोय. प्रीती झिंटा ने ज्या प्लेअरला चुकून टीम मध्ये घेतलेलं तो पुढच्या रिटर्न लिस्टमध्ये रिटर्न होणारा पहिला प्लेयर ठरू शकतो आणि त्यामुळेच जर का माणसाला चुकून सुद्धा दुसरा चान्स मिळाला तर काय करू शकतो तो यच उत्तम उदाहरण म्हणजे शशांक सिंह.

तुम्हाला काय वाटतं शशांक सिंह इंडियन क्रिकेट मध्ये कुठे पर्यंत मजल मारू शकतो? तुमची प्रतिक्रिया नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद!!