IPL प्लयेर्सना करोडो रुपये खर्चून आयपीएल पैसे कसं कमावतो | Business Plan of IPL

Business Plan of IPL:

IPL जिंकणाऱ्या संघाला 20 करोड रुपयांचं बक्षीस मिळतं पण एकट्या मिचेल स्टार्कला तर 24 करोड रुपये घालून कोलकत्ता नाइट राइडर्स ने विकत घेतलं. कोलकत्ता ने फायनल जिंकलं तरी त्यांना चार कोटी रुपयांचा तोटा होईल असे सर्वांना वाटत असेल पण नाही आयपीएल फक्त 20 करोड रुपयांच्या बक्षिसासाठी खेळला जाणारा खेळ नाहीये तर त्यात तब्बल दहा बिलियन डॉलर म्हणजे 8 खरंब 32 अरब 97 करोड आणि 5 लाख रुपयांची उलाढाल होते. 2008 मध्ये फक्त 2400 करोड रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आज कुठच्या कुठपर्यंत गेला.

पैशांच्या बाबतीत अमेरिकेतल्या नॅशनल फुटबॉल नंतरन आपल्या आयपीएलचाच नंबर लागतो आणि आज आपण IPL मधील खेळाडू, संघमालक, टीव्ही ब्रॉडकास्टिंग वाले आणि बीसीसीआय कसे व किती किती पैसे कमावतात याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या आर्टिकल ला फक्त आणि फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.

आपल्या आयपीएल बिझनेस मॉडेल चे तीन स्टार प्लेयर आहेत आणि एक हेड आहे. जो की हा सगळा बिजनेस हॅण्डल करतो. त्यात संघ ब्रॉडकास्टिंग वाले किंवा आपण त्यांना मीडिया राइट्स असे म्हणतो आणि सोबतच स्पॉन्सर. हे आपले तीन स्टार प्लेयर आहेत आणि यांचा हेड आहे बीसीसीआय. आता या सगळ्या जणांकडे मिळून पाच प्रमुख इन्कम सोर्स आहेत.

Business Plan of IPL
Business Plan of IPL

IPL मधून पैसे कमवण्याचे पाच प्रमुख इन्कम सोर्स

ज्यात पहिला बिझनेस आहे सेंट्रल पूल म्हणजे मीडिया राइट्स आणि स्पॉन्सरशिप दुसरा बिझनेस टीम स्पॉन्सरशिप बिझनेस तिसरा तिकीट सेल तर चौथा बिझनेस जाहिराती म्हणजेच एडवर्टाइजमेंट आणि पाचवा बिझनेस आहे तो म्हणजे फ्रॅंचायजीचा लिलाव.

आता हा बिझनेस मॉडेल समजून घेण्यासाठी थोडा वेळ तुम्ही असं समजा की तुम्ही चार मित्र आहेत आणि त्यांचे पाच वेगवेगळे बिजनेस आहेत. आता या पाच बिजनेस मधून किती पैसा येतो व तो त्याच्या मित्रांमध्ये कसा वाटला जातो हे पाहू.

मीडिया राइट्स आणि स्पॉन्सरशिप | Business Plan of IPL

या पाच पैकी पहिलाच बिझनेस सगळ्यात मोठा आहे. जो ओवरऑल सगळ्या इन्कम मध्ये 70 ते 80% योगदान देतो. तो बिझनेस म्हणजे मीडिया राइट्स आणि स्पॉन्सरशिप. जेव्हा 2008 मध्ये आयपीएल सुरू झाली होती तेव्हा त्या लाईव्ह मॅचेस सोनी स्पोर्ट्स किंवा सेट मॅक्स वरती प्रसारित केल्या जायच्या. कारण त्यावेळी सोनी टीव्ही आणि बीसीसीआय कडून 8200 करोड रुपयांना लाईव्ह प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले होते आणि हे हक्क 2008 ते 2017 पर्यंत म्हणजे जवळपास दहा वर्षासाठी होते.

त्यानंतर पुन्हा बीसीसीआयने 2018 ते 2022 पर्यंतचे हक्क Disney Star ला 16,300 करोड रुपयांना विकले आणि सध्या अंबानी ची वायकम 18 व Disney Star या कंपनीने 2017 ते 2023 या पाच वर्षांसाठी तब्बल 48 हजार 390 करोड रुपये मोजले होते. बघा म्हणजे सुरुवातीच्या दहा वर्षासाठी फक्त 8000 करोड रुपये आणि त्यानंतर च्या पाच वर्षासाठी 16000 करोड आणि आता डायरेक्ट 48 हजार करोड रुपये द्यावे लागले. आता याची किती टक्क्यांनी ग्रोथ झाली याचा हिशोब लावायला बसाल तर दिवस सुद्धा पुरायचा नाही. हे झाले मीडिया राइट्स चे पैसे यात सब बिझनेस आहे स्पोन्सरशिप.

आयपीएल सुरू झाली तेव्हा DLF आयपीएल होतं आणि मध्यंतरी विवो, पेप्सी आणि आता टाटा आयपीएल आहे. आता 2008 मध्ये हे नाव लावण्यासाठी बीसीसीआयने 40 करोड रुपये घेतले होते आणि आता टाटा ने 335 करोड रुपये दिलेत. हे 335 करोड आणि मीडिया राइट्स मिळून 48,725 कोटी रुपये इतके होतात.

समजा, आता हे सगळे पैसे चार मित्रांपैकी फक्त दोघांना 50%-50% पैसे मिळतात. हे दोघे म्हणजे बीसीसीआय आणि आयपीएलचा संघमालक असतात. बीसीसीआयचे तर 50 टक्के पक्के आहेत. पण आयपीएलचे जे दहा संघ आहेत त्या संघ मालकांना ते 50% सम समान पैसे वाटून मिळतात. ओके तर हा झाला पहिला बिझनेस आणि त्याच्यापासून कमावलेल्या पैशांची वाटणी ही अशी होते.

टिम स्पॉन्सरशिप | Business Plan of IPL

आता दुसरा बिजनेस आहे तो म्हणजे टीम स्पॉन्सरशिप. आयपीएल मध्ये प्रत्येक संघाची जर्सी वेगवेगळी आहे आणि त्यावर ब्रँड चे नाव देखील वेगवेगळे आहेत. समजा, आपण मुंबईचे उदाहरण घेऊयात. त्यांच्या जर्सीवर स्लाईस व IDFC चा लोगो तुम्हाला पाहायला मिळतो आणि हे आहेत त्यांचे मेन जर्सी स्पॉन्सर्स. आता या स्लाईस, फिनटेक कंपनीने लोगो लावण्यासाठी तब्बल 100 करोड रुपये मोजले आहेत. असेच अजून जेवढे लोक तुम्हाला त्यांच्या जर्सी वरती दिसतात त्यांना काहींना काही पैसे मोजलेले असतात. आता या सगळ्या पैशांवर हक्क ज्या त्या संघमालकांचा राहतो. यातुन बीसीसीआईला वाटा राहतो, ब्रॉडकास्टिंग वाल्यांना आणि स्पॉन्सर ने तर स्वतःचेच पैसे घातले म्हणजे त्यांचा काही विषय राहत नाही.

तिकीट सेलिंग | Business Plan of IPL

आता दोन बिजनेस झाले. आता तिसरा बिझनेस म्हणजे तो आहे तिकीट सेलचा. आपल्या देशात आयपीएलची क्रेज किती आहे हे वेगळं सांगायलाच नको. आपण टीव्हीवर पाहतो की स्टेडियम मध्ये हजारो लोक बसलेले असतात. हजारो लोक तिथे दिसतात. तिथल्या तिकिटांची किंमत ही 3000 पासून ते 30 हजार रुपयांपर्यंत असते. आपण टेंटेटिव पाच हजार रुपये पर तिकीट पकडू आणि 40 हजार प्रेक्षक. तर त्याची किंमत दोन करोड रुपये एवढी होते. हे झालं एका मॅचचे. अशा एकूण 74 मॅचेस होतात. म्हणजेच जवळपास 150 करोड रुपये नुसते तिकिटापासून मिळतात. सोबतच मॅचच्या दिवशी स्टेडियम मध्ये फास्ट फूड आणि थंडी पेय विकले जातात. त्याची सुद्धा काही पैसे मिळतात. आता हे सगळे पैसे प्रामुख्याने ज्या संघाचा होम ग्राउंड असेल त्या संघाला 80 टक्के आणि उरलेले दहा-दहा टक्के हे बीसीसीआय आणि स्पॉन्सरला मिळतात.

जाहिरात | Business Plan of IPL

आता पुढचा बिझनेस आहे तो म्हणजे म्हणजेच Advertisement म्हणजेच जाहिरातींचा. हा आहे चौथा बिझनेस. आपण या चौघांच्या पहिल्या बिजनेस मध्ये मीडिया राइट्स मिळवण्यासाठी Viacom 18 व Disney Star ने 48 करोड रुपये दिल्याचे मी तुम्हाला पहिला सांगितलं होतं. आता हे दिलेले पैसे रिकव्हर करून त्याच्या दुपटीने तिपटीने जास्त पैसे हे ब्रॉडकास्टिंग वाले कमवतात. Viacom 18 चे CEO अनिल जयराज यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं की, गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये आयपीएल 449 मिलियन म्हणजे जवळपास 44 हजार 90 लाख लोकांनी पाहिलं होतं. पण जवळपास आपल्या अर्ध्या देशाला क्रिकेटचे किती वेढ आहे आता हे नव्याने सांगायला नको.

आता हे लोक IPL टीव्ही वरती पाहतात नाहीतर मोबाईल वरती पाहतात. पण दोन्हीकडे एक ओवर संपली की लगेच जाहिरात येतेच आणि या जाहिरातीचे स्लॉटचे पैसे ब्रॉडकास्टिंग वाले कमवत असतात. जाहिरात जर 10 सेकंदाची असेल तर त्याचा 14 लाख रुपये रेट असतो आणि जर तीच जाहिरात 30 सेकंदाची असेल तर तीच किंमत एक करोड रुपया पर्यंत ही जाते. म्हणजेच प्रत्येक मॅचमध्ये जास्तीत जास्त 2300 सेकंदाचा Ad space बीसीसीआयने ठरवून दिलेला आहे.

आता आपण तात्पुरते एक सेकंदाच्या जाहिरातीला दोन लाख रुपये धरू. तर प्रत्येक मॅचला 23 सेकंदाचे चार करोड 60 लाख रुपये होतात आणि जेव्हा सेमी फायनल व फायनल असते तेव्हा तर हे रेट डबल होत असतात आणि हे सगळे पैसे फक्त आणि फक्त मीडिया राइट्स असणाऱ्या कंपनीलाच मिळतात. त्याच्यावर बाकीच्या तीन मित्रांचा काहीही अधिकार नसतो.

आतापर्यंत आपण चार बिजनेस पाहिले की आयपीएलचा बिझनेस, आयपीएलचा जो मॉडेल आहे तो कशाप्रकारे काम करतो. आता यातली सर्वात शेवटची स्टेप म्हणजेच ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकॉस्टिंग वाले पार्टनरला पैसे सुद्धा मिळत असतात. उलट त्यांनी 48 हजार करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली होती पण या गाड्यांनी एकाच बिजनेस मधून सगळे पैसे वसूल केले.

फ्रेंचाईजीचा लिलाव | Business Plan of IPL

पुढचा एक म्हणजे फ्रेंचाईजीचा लिलाव. सध्या दहा टीम आहेत आणि अजून एखादी टीम वाढवायची असेल तर बीसीसीआय हे त्याचे पैसे घेत. 2021 मध्ये लखनऊ ची टीम आली. ती टीम बनवण्यासाठी RP संजीव गोयंका यांनी ७९० करोड रुपये बीसीसीआयला दिले होते. आता बीसीसीआय हेड प्लेयर असल्यामुळे हे सगळे पैसे त्यालाच मिळतात बाकी कोणाचाही हक्क त्याच्यावरती नसतो.

थोडक्यात सांगायच अस:

आता ओव्हरऑल सगळे बिजनेस पाहिले तर त्याच्या मित्रापैकी बीसीसीआयचा वाटा सगळ्यात मोठा असतो. तर दोन नंबरला संघमालक, तीन नंबरला ब्रॉडकास्टिंग वाले आणि शेवटी स्पॉन्सरशिप वाले. तर अशा प्रकारे IPL मध्ये पैशाच चक्र चालतच राहतं. आता IPL मध्ये डायरेक्ट पैसे मिळणार हे लगेच दिसतं, पण इनडायरेक्ट फायदे होणारे खूप सारे छोटे मोठे व्यापारी किंवा इंडिव्हिज्युअल माणसे सुद्धा खूप आहेत.

समजा, मुंबई आणि चेन्नईची मॅच पुण्यात असेल ती पाहायला या दोन्ही शहरातील फॅन येतीलच. ते आले म्हणजे त्यांना राहण्यासाठी हॉटेल लागतील, स्टेडियम कडे जाण्यासाठी रिक्षा लागेल किंवा टॅक्सी लागेल किंवा अशातूनच हॉटेल वाले किंवा ट्रॅव्हलिंगच्या सुविधा पुरवणाऱ्या सगळ्यांनाच या आयपीएलमुळे खूप सारा फायदा होतो आणि पर्यायाने आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये सुद्धा आयपीएलचा खूप मोठे मोलाचे योगदान बनते व त्या मोलाचा वाटा सुद्धा त्यात राहतो.

मला विश्वास आहे की आम्ही आतापर्यंत जेवढी काही आयपीएलच्या बिझनेस मॉडेल बद्दल माहिती सांगितली तेवढ्यांनी तुमचे सर्व प्रश्न सुटले असतील आणि नसले सुटले तर कमेंट करून विचारा. आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देऊ..!! धन्यवाद !!